विशेषण उदाहरण मराठी [ Best ] visheshan examples in marathi 2022

विशेषण उदाहरण मराठी visheshan examples in marathi

विशेषण उदाहरण मराठी

● विशेषण ●

विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्या नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द .

 

उदाहरण. खूप , पिवळे , हुशार , मऊसर , चांगला , दुष्ट , सुंदर , आंबट इत्यादी

 

विशेषणाचे एकूण तीन प्रकार पडतात

1) गुणविशेषण 2) संख्याविशेषण

3) सर्वनामीक विशेषण

 

1) गुणविशेषण

वाक्यामधील नामाचा गुण किंवा विशेष दाखवतो त्यास गुणविशेषण म्हणतात

उदाहरण.

i) काळा कुत्रा

ii) सुंदर मुलगी

iii) गरीब शेतकरी

iv) तुरट आवळा

v) मऊसर भात

 

विशेषण उदाहरण मराठी visheshan examples in marathi

2) संख्याविशेषण

नामाची संख्या दर्शवणाऱ्या विशेषणास संख्याविशेषण म्हणतात .

 

संख्याविशेषणाचे पाच उपप्रकार पडतात

अ) गणनावाचक ब) क्रमवाचक

क) आवृत्तीवचक ड) पृथकवाचक

इ) अनिश्चित

 

मराठी व्याकरण

इंग्रजी व्याकरण

 

अ) गणनावाचक संख्याविशेषण

गणना किंवा गिणती करण्यासाठी उपयोग होणाऱ्या विशेषणास गणनावाचक संख्याविशेषण म्हणतात .

उदाहरण.

i) सहा घोडे ii) दोन मित्र iii) बारा तास

iv) शंभर जागा v) अकरा खेळाडू vi) पाऊण तास

 

*गणनावाचक संख्याविशेषण तीन प्रकार

पूर्णांक वाचक –

एक , दोन .. हजार , लाख , कोटी इत्यादी

1 , 2..1000 , 100000

i) दोन मित्र ii) हजार मनुष्य

 

अपूर्णांक वाचक – पाव , अर्धा , पाऊण इत्यादी

i) पाव भर साखर ii) अर्धा तास

iii) पाऊण तास

 

साकल्य वाचक – गिणती/वस्तू पैकी किती संख्या आहेत ते सर्व दर्शवणारा शब्द

i) दोन्ही भाऊ ii) चारही व्यक्ती iii) पाची पांडव

 

ब) क्रमवाचक संख्याविशेषण

वस्तूंचा क्रम दाखवणाऱ्या विशेषणास क्रमवाचक संख्याविशेषण म्हणतात .

उदाहरण. i) पहिला आठवडा  ii) दुसरा वर्ग

iii) पंचाहत्तरावे वर्ष  iv) तिसरा ग्रह

 

क) आवृत्तीवचक संख्याविशेषण

संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शवते त्यास आवृत्तीवचक संख्याविशेषण म्हणतात.

उदाहरण. i) दुहेरी रंग  ii) तिप्पट नफा  iv) द्विगुणित आनंद   v) दुप्पट महाग

 

ड) पृथकवाचक संख्याविशेषण

वेगवेगळे पणाचा बोध होणाऱ्या विशेषणास पृथकवाचक संख्याविशेषण म्हणतात .

उदाहरण . i) एकेक मुलगी  ii) चार-चार मुली

iii) पाच-पाच रुपये  iv) दहा-दहा टोप्या

 

इ) अनिश्चित संख्याविशेषण

निश्चित अशी संख्या न दाखवणाऱ्या संख्याविशेषणास अनिश्चित संख्याविशेषण म्हणतात.

उदाहरण. i) काही घोडे  ii) थोडी मूल  iii) सर्व प्राणी  iv) इतर राज्य  v) इत्यादी पर्वत

 

विशेषण उदाहरण मराठी visheshan examples in marathi

3) सर्वनामीक विशेषण

सर्वनामीक विशेषण म्हणजे सर्वनामांपासून बनलेले विशेषण

उदाहरण. i) हा मुलगा  ii) तो व्यक्ती  iii) माझे गाव  iv) ती बाई  v) असल्या झोपड्या  vi) तिच्या बहिणी

हे पण वाचा : नाम

हे पण वाचा : सर्वनाम

हे पण वाचा : सामान्य ज्ञान

हे पण वाचा : [ Simple ] मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2022

 

हे पण वाचा : Awesome 🙏 Ganapati aarti marathi 🔔 मराठी 2022

 

हे पण वाचा : [ Greatful ] Good hanuman chalisa in marathi 2022

 

हे पण वाचा : इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi 2022

 

हे पण वाचा : [ Energy ] Best Motivational quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी 2022

 

हे पण वाचा : [ Happy ]- Birthday wishes in marathi || 🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022

 

 

Rate this post

Leave a Comment