Table of Contents
सर्वनाम व त्याचे प्रकार sarvanam in marathi
● सर्वनाम ●
सर्वनाम म्हणजे नामा ऐवजी वापरला जाणारा शब्द .
उदाहरणे. मी , तू , तुम्ही , तो , ती, त्या, हा , ही , हे , जो , जी , जे , ज्या , आपण , स्वतः , कोण , काय इत्यादी .
सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात :
1) पुरुषवाचक 4) प्रश्नार्थक
2) दर्शक 5) सामान्य
3) संबंधी 6) आत्मववाचक
1) पुरुषवाचक सर्वनाम purushvachak sarvanam
पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण तीन उपप्रकार पडतात
i) प्रथम पुरुषवाचक
ii) द्वितीय पुरुषवाचक
iii) तृतीय पुरुषवाचक
sarvanam in marathi
i) प्रथम पुरुषवाचक
बोलताना स्वतःबद्दल वापरलेले सर्वनाम म्हणजेच प्रथम पुरुषवाचक सर्वनाम.
उदाहरण. मी , आपण , आम्ही , स्वतः इत्यादी
मी एक विद्यार्थी आहे
मला स्वतः ला पण शिवणकाम येते
ii) द्वितीय पुरुषवाचक
समोरच्याशी बोलताना वापरलेले सर्वनाम म्हणजेच द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम .
उदाहरण. तू , आपण , तुम्ही , स्वतः इत्यादी
i) तू नेहमी हसतोस
ii) आपण गावी जाऊ
iii) तुम्ही नेहमी भांडण का करता
iv) आपापल्याला स्वतःबद्दल चांगली ओळख बनवायची आहे .
iii) तृतीय पुरुषवाचक
समोरच्याशी बोलताना तिसऱ्याबद्दल वापरलेले सर्वनाम म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम.
उदाहरण. तो, ती , ते , त्या ..
i) तो नेहमी उशिरा उठतो
ii) ती खूप अभ्यासू आहे
iii) ते पर्यटन स्थळ खूप छान आहे
iv) त्या ठिकाणी जाण्यास मनाई आहे
सर्वनाम व त्याचे प्रकार || सर्वनामचे उदाहरणे || sarvanam in marathi
2) दर्शक सर्वनाम
जवळपासच्या किंवा दूरच्या व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम .
उदाहरण. हा , ही , हे , तो , ती , ते , तेथे , येथे …
i) हा पेन
ii) ही शाळा
iii) हे ठिकाण
iv) तो घोडा
v) ती विहीर
vi) तेथे खूप गर्दी आहे
vii) येथे नेहमी वाघ फिरतो
3) संबंध दर्शक सर्वनाम
पुढे येणाऱ्या सर्वनामाशी संबंध दाखवणारे सर्वनाम म्हणजे संबंध दर्शक सर्वनाम
उदाहरण. जो , जी , जे , ज्या इत्यादी
i ) जे मला वाटते ते मी करतो
4) प्रश्नार्थक सर्वनाम
ज्या सर्वानामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी होतो त्या सर्वानामाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात
उदाहरण. कोणास , कोणी , काय , कधी , कोण , कोणाला इत्यादी
i) तुम्हाला कोण पाहिजे ?
ii) मी काय बोललो ते सांगा ?
सर्वनाम व त्याचे प्रकार || सर्वनामाचे उदाहरणे
5) सामान्य/अनिश्चित सर्वनाम
वाक्यात येणारे सर्वनाम कोणत्या हे अनिश्चित सांगता येत नसेल तर ते सामान्य/अनिश्चित सर्वनाम असते .
उदाहरण. काय ,कोण ..
i) मी काय सांगतो आहे त्यावर नीट लक्ष द्या
हे पण वाचा : नाम व नामाचे प्रकार
हे पण वाचा : विशेषण
हे पण वाचा : birthday wishes in marathi
6) आत्मवाचक सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम म्हणजे स्वतः बद्दल उल्लेख करताना वापरले जाणारे सर्वनाम.
उदाहरण. स्वतः , आपण , स्वतःला इत्यादी
i) मी स्वतः मोटार चालवतो
ii) तो आपण होऊन माझ्याकडे आला
iii) तुम्ही स्वतःला खूप हुशार समजता?