prayog in marathi प्रयोग मराठी व्याकरण
* प्रयोग *
(i) कर्तरी प्रयोग : कर्त्याचे लिंग , वचन याप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत असते त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात .
उदा. (i) तो वाचन करतो
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)
(ii) ती वाचन करते
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)
(iii) ते वाचन करतात .
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)
वरील वाक्यातील लींग , तो , ती , ते आणि वचन ते याप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलले आहे . म्हणून हे कर्तरी प्रयोग आहे.
वरील तिन्ही वाक्यातील क्रियापदे करतो , करते , करतात . हे
कर्तरी प्रयोगाचे आहे .
prayog in marathi प्रयोग मराठी व्याकरण
(ii) कर्मणी प्रयोग : कर्माचे लिंग , वचन याप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत असते त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात .
उदा. (i) मुलानी आंबा खाल्ला .
(ii) मुलीनी आंबा खाल्ला.
(iii) मुलानी चींच खाल्ली .
(iv) मुलांनी पेरू खाल्ले .
वरील वाक्यात कर्म आंबा , चींच , पेरू यांप्रमाने क्रियापदाचे रूप बदलले , म्हणून खाल्ला , खाल्ली , खाल्ले हे कर्मणी प्रयोग आहे .
( अ ) कर्मकर्तरी प्रयोग : जर वाक्यात कर्त्याला कडून हा प्रत्यय लावून येत असेल तर त्यास कर्मकर्तरी प्रयोग म्हणतात .
उदा. (i) शिपायाकडून चोर पकडला गेला .
(ii) माझ्याकडून पत्र लिहीले गेले .
(iii) भावे प्रयोग : जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग/वचनात बदल करून सुध्या क्रियापदा मध्ये काही बद्दल होत नाही त्यास भावे प्रयोग म्हणतात .
उदा. (i) सुरेशने बैलाला पकडले .
(ii) शिलाने बैलाला पकडले . ( लींग बदलून)
(iii) त्यांनी बैलाला पकडले . ( वचन बदलून)
हे पण वाचा : नाम व नामाचे प्रकार
हे पण वाचा : सर्वनाम व त्याचे प्रकार
-कर्माचे लींग बदलून –
(i) सुरेशने गाईस पकडले .
(ii) शिलाने गाईस पकडले .
(iii) त्यांनी गाईस पकडले .
वरील वाक्यातील कर्ते सुरेशने , शिलाने , त्यांनी हे असून सुध्या क्रियापद पकडले यामध्ये काहीही फरक पडला नाही क्रियापद तोच राहिला.
तसेच कर्म बैलाला ऐवजी गाईस हे स्त्रीलींग वापरून सुध्दा क्रियापदाचे रूप बदलले नाही म्हणून हे भावे प्रयोग आहे .