नाम व नामाचे प्रकार
● नाम ●
नाम म्हणजे कोणत्याही स्थळाला , व्यक्तीला किंवा वस्तूला दिलेले नाव होय.
उदाहरण. माहूरगड , आंबा , राम , टेबल इत्यादी .
i) माहुरगड हे एक देवस्थान आहे .
ii) आंबा गोड आहे .
iii) राम गाणं गातो .
iv) टेबल खूप महाग आहे
नामामध्ये नामाचे 3 प्रकार पडतात .
1) सामान्य नाम
2) विशेष नाम
3) भाववाचक नाम
नाम व नामाचे प्रकार
1) सामान्य नाम
सामान्य नाम म्हणजे समान गुणधर्मांमुळे दिले जाणारे नाम होय.
उदाहरण. मुलगी , टेबल , प्राणी , शहर इत्यादी
2) विशेष नाम
विशेष नाम म्हणजे विशिष्ट अशा वस्तूचा , प्राण्यांचा , स्थळांचा , पक्षांचा किंवा व्यक्तींचा बोध होतो .
उदाहरण. राजू , झाडू , बैल , शेगाव , मोर , महेश इत्यादी
हे पण वाचा : सर्वनाम
3) भाववाचक नाम
भाववाचक नाम म्हणजे ज्या नामामध्ये पदार्थ किवा प्राणी यांमधील गुणांचा , धर्माचा किंवा भावाचा बोध होतो .
उदाहरण. हास्य , धैर्य , आनंद , प्रामाणिक , धूर्तपणा , चांगुलपणा इत्यादी.