क्रियापद
वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
क्रियापद मराठी उदाहरणे kriyapad in marathi
उदाहरणे. खाते , लिहितो , काढतो , धुते , चालवतो , जातो , खेळतो , इत्यादी
i) मिरा आंबा खाते.
ii) चित्रकार चित्र काढतो.
iii) आई भांडी धुते.
iv) प्रभास मोटार चालवतो.
क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार :
१) सकर्मक क्रियापद २) अकर्मक क्रियापद
1) सकर्मक क्रियापद
वाक्यामध्ये क्रियापदास वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्यास सकर्मक क्रियापद म्हणतात.
उदाहरणे. i) सूरज गाडी चालवतो.
ii) आई भांडी घासते.
*वरील वाक्यांमध्ये (चालवणे) चालवतो आणि (घासणे) घासतेया क्रियापदाचा अर्थ पूर्ण झाला . पहिल्या वाक्यात गाडी व दुसऱ्या वाक्यात भांडी ह्या कर्माची गरज पडलेली आहे.
2) अकर्मक क्रियापद
वाक्यामध्ये क्रियापदास वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्यास अकर्मक क्रियापद म्हणतात.
उदाहरणे. i) तो हसला
ii) ती ओरडली
अकर्मक क्रियापद क्रियापदाचे काही उपप्रकार :
अ) द्विकर्मक क्रियापद ब) उभयविध क्रियापद
क्रियापद मराठी उदाहरणे kriyapad in marathi क्रियापद व त्याचे प्रकार
अ) द्विकर्मक क्रियापद
ज्या क्रियापदास दोन कर्म लागतात त्यास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात.
उदाहरणे.
i) रवीने राजूला चिंच दिली .
ii) समिरने रवीला गायाल शिकवले.
क्रियापद व त्याचे प्रकार
ब) उभयविध क्रियापद
दोन वेगळ्या वाक्यात सकर्मक आणि अकर्मक अशा प्रकारे वापरता येणाऱ्या एकाच प्रियापदाला उभयविध क्रियापद म्हणतात.
हे पण वाचा : marathi name of tuna fish
हे पण वाचा : विशेषण
उदाहरणे :- उघडले , मोडले , कापले , आठवले , लोटले
i) परशुरामाने धनुष्य मोडले. ( सकर्मक क्रियापद )
ते लाकडी धनुष्य मोडले ( अकर्मक क्रियापद )
ii) त्याने घराचे दार उघडले. ( सकर्मक क्रियापद) त्याच्या घराचे दार उघडले ( अकर्मक क्रियापद)
Follow on instagram